जळगाव, प्रतिनिधी | येथे परशुराम सांळुके यांच्या अध्यक्षतेखाली माहिती अधिकार कार्यकर्ता संगठनच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला राज्यातील आठ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांना संगठन त्यांना कशा प्रकारे मदत करेल याचे मार्गदर्शन करण्यात आले.
माहिती अधिकार जनजागृती समिती अध्यक्ष अजय तुंबे यांनी बैठकीबाबत ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी बोलतांना सांगितले की, शासकीय कर्मचारी माहितीचा दुरुपयोग करीत असून याचा सर्व आरोप माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनवर फोडून माहिती अधिकारी कार्यकर्त्यांची बदनामी करत आहेत. या कर्मचाऱ्यांकडून माहितीतर मिळत नाही मात्र माहिती अधिकारी कार्यकर्त्यांवर खंडणीसारखे गुन्हे दाखल केले जात आहेत. कार्यकर्ता हा एकाकी असल्याने त्यावर विविध गुन्हे दाखल होत आहेत. तो एकाकी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे. त्याला न्याय मिळत नाही. त्याला न्याय मिळावा यासाठी संघटनेचे बळ हे सर्वात मोठे बळ आहे. जे लोक पिडीत आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देणे आणि लोकामध्ये माहिती अधिकाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हे संगठन काम करणार असल्याचे श्री. तुंबे यांनी सांगितले. यावेळी जळगावचे अमोल कोल्हे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.