समता नगरातील मुलाचा तलावात बुडून मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील समता नगरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा शिरसोली प्र.बो. शिवारातील बुधली धरणावर पोहतांना बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २८ जुलै रोजी सायंकाळी घडली आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात मृतदेह आणण्यात आला आहे.

 

अमोल ज्ञानेश्वर भालेराव (वय-१५) रा. समता नगर, जळगाव असे मृत मुलाचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी की, अमोल भालेराव हा आई, वडील आणि लहान भाऊ याच्यासह वास्तव्याला आहे. अमोल हा दहावीचे शिक्षण करतो. गुरूवारी २८ जुलै रोजी दुपारी मित्रांसह तालुक्यातील शिरसोली प्र.बो. शिवारातील बुधली धरणावर पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान, पोहतांना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला उपस्थित नागरीकांच्या मदतीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची गर्दी जमली होती. मयत अमोलचे वडील हे महापालिकेत कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम करतात.

Protected Content