यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथे उद्या काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र शासनाच्या विरूद्ध ‘महागाई मुक्त आंदोलन’ होणार असून या आंदोलनात सर्वसामान्य जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारच्या कार्यकाळात भरमसाठ वाढलेल्या महागाईच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या वतीने यावल येथे उद्या महागाई मुक्त भारत आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्रात पंतप्रधान नरेन्द मोदी यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या गोंधळलेल्या व इंधन दरवाढीच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची लुटमार करून कंबरडे मोडणाऱ्या महागाईने देशातील सर्वसामान्य व्यक्ती बेहाल झाला आहे. या बेजबाबदार व अर्थहीन शासन कारभाराने संपूर्ण देशाला वेठीस धरले असून जीवनावश्यक वस्तूंपासून पेट्रॉल, डीझेल, घरगुती गॅस सिलेंडर यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
या महागाईच्या विरोधात रावेर यावल विधान सभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी व काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वखाली काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर विश्वनाथ चौधरी, खरेदी विक्री संघाचे संचालक आर.जी.पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर पाटील, नितीन चौधरी, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरुड, पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत पाटील यांच्यासह आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे.
तालुक्यातील शेतकरी बांधव, सर्वसामान्य नागरीकांनी या महागाईमुक्त आंदोलनात सहभाग घ्यावा. धरणे आंदोलनात सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, कार्यकर्ते यांनी शुक्रवारी दिनांक १ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता यावल पोलीस स्टेशनच्या आवारात उपस्थित राहावे असे आवाहन कॉंग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान, उपाध्यक्ष अनिल जंजाळे यांच्यासह पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.