अमळनेर, सामाजिक

जेडीसीसी बँकेच्या मृत ग्राहकाच्याकुटुंबाला एक लाखाचा धनादेश

शेअर करा !

वाचन वेळ : 1 मिनिट

 

 

 

 

 

c8b4c015 feb7 46f6 96fb 626e5f139f85

*अमळनेर (प्रतिनिधी)* तालुक्यातील टाकरखेडा येथील अपघातात मृत झालेल्या जेडीसीसी बँक ग्राहकाच्या कुटुंबातील सदस्यांना एक लाख रुपयांचा धनादेश आज देण्यात आला.

 

टाकरखेडा येथील हायस्कुलमध्ये कार्यरत असलेले शशिकांत भास्करराव पवार यांचा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अपघात होऊन मृत्यू झाला होता. जेडीसीसी बँकेचे नियमित एटीएमधारक असल्यामुळे ते मयत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य व मयताच्या पत्नी यांना विमा सरक्षणापोटी एक लाखाचा धनादेश आज जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शाखाधिकारी संजय पाटील, गोविंद विंचूरकर व कर्मचारी उपस्थित होते.

आपल्याला हे देखील आवडू शकते !


शेअर करा !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*