प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे असतील इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये इंडोनेशियाचे अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर आता ते पहिल्यांदाच भारत भेटीवर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेले आमंत्रण त्यांनी स्वीकारल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रबोवो सुबियांतो हे २५-२६ जानेवारीला भारतात स्टेट व्हिजिट साठी येणार आहेत. दिल्लीच्या राजपथावर होणार्‍या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होणार आहेत.

इंडोनेशियाचे माजी संरक्षण मंत्री प्रबोवो सुबियांतो यांची गेल्या वर्षी निवडणूक जिंकल्यानंतर राष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झाली. प्रबोवो सुबियांतो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदा येत असले तरीही इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री असताना सुबियांतो २०२० मध्ये नवी दिल्लीला भेट दिली होती. इंडोनेशियन राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी सुबियांतो यांना मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांचा सामना करावा लागला होता, ज्याचा त्यांनी अनेकदा इन्कार केला होता. यावरूनच त्यांना अमेरिकेमध्ये जाण्यासही मनाई करण्यात आली होती.

Protected Content