जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोशिएशन यांच्यातर्फे बी यु एन रायसोनी विद्यालय जळगाव येथे शालेय डॉजबॉल स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. यात१७ वर्ष आतील मुले,मुली, तथा १९ वर्ष आतील मुले या तीनही गटात शालेय जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत इंदिराबाई ललवाणी माध्य.व उच्च माध्य.विद्यालयाचा संघ प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे.
विभागीयस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे सचिव किशोर महाजन यांच्या शुभहस्ते सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपमुख्याध्यापक एस एन चवरे, उपप्राचार्य प्रा.के.एन मराठे, क्रीडा विभाग प्रमुख जी सी पाटील, बी पी बेनाडे, गजानन कचरे, प्रा.समीर घोडेस्वार आदी उपस्थित होते.
तर क्रीडा विभाग प्रमुख जी सी पाटील, उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार, डॉजबॉल राष्ट्रीय खेळाडू सुष्मित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असो.उपाध्यक्ष राजेश जाधव, जळगाव जिल्हा डॉजबॉल असो. सचिव योगेश सोनवणे यांनी अभिनंदन केले तर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.
खेळाडूंची नावे व गट पुढीलप्रमाणे
१७ वर्ष आतील मुले:- तेजस राऊत, सोहम जाधव, पंकज गव्हांडे, तन्मय पाटील, सचिन गव्हांडे, भावेश शिंदे, रामेश्वर परिहार, योगेश पवार, तेजस सपकाळे, सार्थक पाटील
१७ वर्ष आतील मुली:- श्रद्धा शिंदे, मिताली मिस्तरी, प्राची थोरात, जान्हवी पाटील, सलोनी न्हावी, हर्षदा शिंदे, प्रांजली न्हावी, सलोनी वाघ, संचिता पाटील, योगिता इंगळे
१९ वर्ष आतील मुले:- विनायक सपकाळे, विनायक कोळी, शुभम पवार, पियुष थोरात, धीरज वंजारी, धीरज बारी, गुंजन पाटील, सुमित चिंचोले, गोविंदा कोळी, हर्षल उदमले,