नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत अनेक नेते पक्षांतर करत आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहे. यामध्ये काँग्रेसमधून अनेक नेत्यांची एक्सिट झाली आहे आणि ते भाजपमध्ये प्रवेश करत आहे. आता यात अजून एक नावाची भर पडली आहे. देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे हरियाणा काँग्रेसमध्ये मोठे स्थान होते. त्या ओपी जिंदल समूहाच्या चेअरपर्सन आहे.
हिसार विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार होत्या तर हरियाणा राज्यात त्या माजी मंत्रीही होत्या. त्यामुळे काँग्रेस पक्षाला हरियाणा राज्यात मोठे नुकसान झाले आहे. सावित्री यांचे वय ८४ आहे. त्या जिंदल समूहाचा कारभार सांभाळतात. सावित्री जिंदल यांची एकून संपत्ती २.४७ लाख कोटीच्या जवळपास आहे. देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत त्यांचे स्थान पहिले आहे. तर जगात त्यांचा क्रमांक ५६ वा येतो.
त्यांचा ओपी जिंदल समूहाचा व्यवसाय अनेक सेक्टरमध्ये विस्तारलेला आहे. स्टील, एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर, सिमेंट, गुंतवणूक आणि पेंट आदी सेक्टरमध्ये जिंदल समूहाचा व्यवसाय आहे. देशातच नव्हे तर भारताबाहेरही त्यांचा व्यवसाय आहे. सावित्री यांच्याआधी त्यांचे पुत्र नवीन जिंदल यांनीही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते कुरूक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवारी आहे. नवीन जिंदल हे २००४ ते २०१४ पर्यंत सलग दहा वर्ष कुरूक्षेत्रातून खासदार होते.