इंदूर | टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध टी-२० सामन्यात शानदार विजयी सलामी दिली. भारताने मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर सात गड्यांनी मात केली.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमाेर ९ गड्यांच्या माेबदल्यात १४३ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात भारताने सात गडी राखून विजयश्री खेचून अाणली. संघाच्या विजयासाठी सलामीवीर लाेकेश राहुल (४५), शिखर धवन (३२) अाणि श्रेयस अय्यरचे (३४) माेलाचे याेगदान राहिले .तसेच काेहलीने नाबाद ३० धावांची खेळी करून संघाचा विजय निश्चित केला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताकडून शार्दूलने तीन बळी घेतले. नवदीप सैनी अाणि कुलदीपने प्रत्येकी दाेन विकेट घेतेल्या. श्रीलंकेच्या अव्वल फलंदाजांना माेठी खेळी करता अाली नाही. गुणतिलकाने २० व अविष्काने २२ धावांचे याेगदान दिले. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी रचली हाेती. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील तिसरा अाणि शेवटचा निर्णायक सामना शुक्रवारी पुण्याच्या मैदानावर रंगणार अाहे.