तिसऱ्या टर्ममध्ये भारत टॉप-३ अर्थव्यवस्था बनेल – पंतप्रधान मोदी

सूरत-वृत्तसेवा | आम्ही तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन केले आहे. तेलंगाणामध्ये भाजपाच्या मतांत विक्रमी वाढ झाली आहे. यावरून २०२४ च्या निवडणूकीत भाजपचा पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय होणार असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी रविवार सुरत विमानतळाच्रूा नव्या टर्मिनल इमारतीचे आणि सूरत डायमंड एक्सचेन्जचे उध्दाटन केले. यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

आपल्या सर्वांनाच माहित आहे की, गेल्या वर्षांत भारत दहाव्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकाची अर्थ शक्ती बनला आहे. आता मोदीने आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील टॉप-३ इकोनॉमी मध्ये सहभागी होईल, अशी गारंटी देशाला दिली आहे. मेड इन इंडिया आता एक मजबूत ब्रँड बनला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

Protected Content