स्पर्धा परिक्षेत यश मिळवण्यासाठी जादूटोण्याच्या साहयाने महिलेची युवकास फसवेगिरी !

पुणे-वृत्तसेवा | स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाच्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. स्पर्धा परीक्षेत यश न आल्यामुळे नैराश्यात आलेल्या या युवकावर जादूटोणाचे प्रयोग करण्यात आले. त्याला गंडेदोर बांधले. पाय धुतलेले पाणी पिण्यास दिले. तुमचे वय कमी आहे. तुम्ही ३० व्या वर्षी मरणार आहे. उपचार करण्यासाठी दीड लाख रुपये द्या, असे सांगितले. सोशल मीडियावर जाहिरात करुन या पद्धतीचा व्यवसाय महिला करत होती. अखेर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पुणे शाखेने हा प्रकार उघड केला.

पुण्यातील पाषाणसारख्या उच्चभ्रू भागात वृषाली संतोष ढोले शिरसाठ (वय – 39) हिने कन्सल्टन्सीचा व्यवसाय सुरु केला. त्याची जाहिरात सोशल मीडियावर केली. ती जाहिरात पाहून सप्टेंबर २०२१ मध्ये एक २३ वर्षीय युवक गेला. त्या युवकाला स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आले होते. त्यामुळे तो नैराश्येमध्ये आला होता. वृषालीने त्याला कोणतीही समस्या न विचारता अतेंद्रीय शक्तीने आपण सर्व समस्या ओळखत असल्याचे सांगितले. तिने त्या युवकास तुझा मृत्यू होणार आहे. तुझे आयुष्य केवळ ३० वर्षापर्यंत असल्याचे सांगितले. जर तुला जास्त जगायचे असेल तर काही उपचार करावे लागतील. युवकाने घाबरुन जाऊन होकार दिला.

वृषालीने आपल्याकडे आलौकीक शक्ती आहे, असे सांगत युवकाच्या हातात गंडा बांधला. त्याला राख खाण्यास दिली. त्यामुळे त्या युवकाच्या घशाला इजा झाली. त्याल पोटाचा विकार झाला. त्यानंतर औषध उपचार घेण्याची गरज नाही, आपली शक्ती तुला बरे करेल, असे ती सांगत होती. वेळोवेळी तिने युवकाकडून सुमारे दीड लाख रुपये अर्थिक फसवणूक केली. त्या महिलेने युवकाकडून स्वतःची पूजा करून घेऊन त्याला पाय धुतलेले पाणी प्यायला दिले आहे. तसेच वृषालीने युवकाचे मित्र आणि नातेवाईक यांनाही शारीरीक व मानसीक आजार बरे करण्यासाठी घेऊन येण्यास सांगून त्यांचीही फसवणूक केली आहे.

Protected Content