अँटिग्वा वृत्तसंस्था । रहाणेचे शतक आणि त्यानंतर गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीमुळे भारतीय संघाने विंडीजला पहिल्या कसोटीत तब्बल ३१८ धावांनी पराजीत केले असून हा आपला विदेशातील सर्वात मोठा विजय आहे.
भारतीय संघाने रविवारी चौथ्या दिवशी दुसरा डाव ७ बाद ३४३ धावांवर घोषित केला. यासह भारताने यजमान विंडीजसमोर ४१९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. उपकर्णधार अजिंक्य रहाणे (१०२) आणि हनुमा विहारी (९३) यांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजला मोठे आव्हान दिले होते. यानंतर भारतीय गोलंदाजांची कमाल केली. यामुळे विंडीजचा डाव फक्त १०० धावांमध्ये आटोपला. विशेष म्हणजे त्यांचे ५० धावातच नऊ गडी बाद झाले होते. तथापि, रोच आणि कर्मीस यांनी दहाव्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी केली. इशांतने रोचला बाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.