चोपडा बस स्थानकात महिलेची सोनसाखळी लांबवली

download 6

 

चोपडा (प्रतिनिधी) बसमध्ये चढत असतांना महिलेच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किंमतीची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना सोमवारीचोपडा बस स्थानकात घडली आहे.

 

सोमवार दि 26 रोजी विजया प्रल्हाद सुर्वे (वय ६८, रा.शिवराम नगर, जळगाव) या दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चोपडा बस स्थानकात बस क्रमांक (एम एच 20 ०४०७) चढत असतांना त्यांच्या गळ्यातील ६५हजार रुपये किंमतीची अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केली. गळ्यात असलेली सोन्याची पोत कोणीतरी काढली,लक्षात येताच विजया सुर्वे यांनी आरडा-ओरडा केला. सोबतच्या प्रवाशांना घडलेला प्रकार सांगितला. पण तोपर्यंत चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. याबाबत विजया सुर्वे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.ज्ञानेश्वर जवागे हे करत आहेत.

Protected Content