मेलबर्न-वृत्तसंस्था | विराट कोहली आणि हार्दीक पांड्या यांच्या दमदार खेळ्यांच्या मदतीने भारताने पाकला अतिशय चित्तथरारक अशा सामन्यात पराभव केला.
आज टि-२० विश्वचषकात भारताने पाकला धुळ चारली. भारताने टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे पाकचा संघ १६० धावांचेच आव्हान ठेवू शकला. भारताच्या डावाची सुरूवात देखील डळमळीत झाली. केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी केली. दुसर्याच षटकात राहुल ४ धावांवर बाद झाला, त्यानंतर रोहित शर्मा देखील ४ धावांवर माघारी परतला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे फलंदाज मैदानात होते. मात्र सूर्यकुमारने ९ चेंडूत १५ धावा केल्या होत्या, मात्र सहाव्या षटकात एक चौकार मारल्यानंतर सूर्या बाद झाला. त्याने १० चेंडूत २ चौकारांसह १५ धावा केल्या. यानंतर विराट आणि हार्दीकने डाव सावरत भारताला विजयपथावर नेले.
आजच्या सामन्याचे खरे नायक ठरले ते विराट आणि हार्दीक ! एका वेळेस चार बाद ३१ अशी भारताची अवस्था झाली असतांना या जोडीने भारताचा डाव सावरला. सावधगिरीने आणि संधी मिळाल्यास आक्रमण करत या जोडीने धावफलक हलता ठेवत तब्बल १०० धावांची भागीदारी केली. विजयासाठी पाच धावा आवश्यक असतांना हार्दीक ४० धावा काढून बाद झाला. यानंतर दिनेश कार्तीकही लागलीच परतला. मात्र अश्वीनने कोणतीही चूक न करत शेवटच्या चेंडूवर चौकार मारून भारताचा विजय साकारला. अर्थात, याचे श्रेय हे दुसर्या बाजूला असलेल्या तब्बल ८२ धावांवर नाबाद राहिलेल्या विराट कोहली यालाच जाते. शेवटच्या तीन षटकांमध्ये फटक्यांची अक्षरश: बरसात करत त्याने हातातून गेलेला सामना खेचून आणला.