दक्षिण आफ्रिकेवर भारताचा ७ गडी राखून विजय

teem

मोहाली वृत्तसंस्था । दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामना खेळण्यात आला असून या सामन्यात भारताने ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अवघ्या ५२ चेंडूत ७२ धावांची तुफानी फलंदाजी केली. यामुळे तो सामन्याचा खरा हिरो ठरला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहालीमध्ये खेळविण्यात आलेल्या या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २० षटकात ५ गडी गमावून फक्त १४९ धावाच केल्या. तर भारताने आफ्रिकेचं हे आव्हान १९ षटकातच पूर्ण केलं. कारण, कोहलीच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावरच टीम इंडियाने हा सामना सहा चेंडू आणि ७ गडी राखून जिंकला. यावेळी विराटने अवघ्या ५२ चेंडूत ७२ धावांची तुफानी फलंदाजी केली. यावेळी विराटने ४ चौकार आणि २ षटकारही ठोकले. शिखर धवनने त्याला चांगली साथ दिली. एका बाजूने फटकेबाजी सुरू ठेवत विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. पंतनंतर मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यरने विराटला चांगली साथ देत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. विराट ७२ धावांवर, तर श्रेयस अय्यर १६ धावांवर नाबाद राहिले.

Protected Content