डॉ.वैभव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संसर्गजन्य व विषाणूजन्य आजारांसाठी स्वंतत्र ओपीडी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रसिध्द हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्‍त डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयात संसर्गजन्य व विषाणूजन्य आजारांसाठी स्वतंत्र ओपीडी सूरू करण्यात आली आहे. या ओपीडीत तज्ञ डॉक्टरांची टीम तपासणी करणार असून रक्‍त व लघवी चाचण्या देखील अत्यल्प दरात करून देण्यात येणार आहे.

आजार कोणताही असो सर्वसामान्यासाठी न परवडणारा असतो. यातच संसर्गजन्य व विषाणूजन्य आजार म्हटला तर कोठेही दोन ते तिन हजार रूपये एकाच दिवसात खर्च होतात. सर्वसामान्याची हीच अडचण जाणून घेत लोकआग्रहास्तव माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी आज या ओपीडीची घोषणा केली. या ओपीडीत मलेरिया, न्युमोनिया, टायफाईड, डेंग्यू ,अ‍ॅनिमिया, सिरोसिस स्वादुपिंडाचा दाह, काविळ, मेंदुला झटके, फिट्स येणे, डोक्यात ताप जाणे, हदयविकार, हृदयविकाराचा झटका, मेंदू व रक्‍तातील अन्ननलिकेचे आजार, संर्पदंश,विष, दारूमूळे झालेले लिव्हरचे, पोटाचे व अन्ननलिकेचे आजार, किडनी व मुत्रपिंड विकार, मधुमेह, फुफुसाचे आजार, ब्रेनहॅमरेज, पॅरालेसिस आणि लिव्हर, उच्च रक्तदाब, थायरॉईड रोग, सिकलसेल रोग, थॅलेसेमिया रक्‍ताशय, टीबी, श्‍वसन विकारांची निशुल्क तपासणी एमडी मेडीसिन तज्ञ करणार आहे. येथे डॉ सी डी सारंग, डॉ तुषार पाटील, डॉ विजय कुटुंबे ह्या तज्ञांची सेवा उपलब्ध आहे. शिवाय ज्या रूग्णांना पुढील उपचाराची गरज भासेल त्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना, कर्मचारी विमा योजना, कॅशलेस सुविधेत निशुल्क उपचार देखिल करण्यात येणार आहे. याचबरोबर रक्‍त, लघवी, सोनोग्राफी आणि एक्सरे सारख्या तपासण्या देखिल अत्यल्प दरात केल्या जाणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. जिवक काकडे ९१३०८ ८६४९६,डॉ. आकाश जाधव  ९९२२५ ५५७९१ यांचेशी संपर्क करा

हृदयविकार तपासणी शिबिर

हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या वाढदिवसाचे निमीत्‍त साधून हृदयविकार तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यात टु डी इको, टी एम टी आणि एन्जीओग्राफी अत्यल्प दरात केली जाणार आहे. तसेच यानंतर ज्या रूग्णांना एन्जीओप्लास्टीचा सल्‍ला देण्यात आला आहे अश्या रूग्णांना योजनांचा लाभ मिळवून देत मोफत एन्जीओप्लास्टी केली जाणार आहे. यासाठी रत्नशेखर जैन यांचेशी ७०३०५७११११ या क्रमांकवर नोंदणी करणे आवश्यक असून जास्तीत जास्ती रूग्णांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content