वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांचा बेमुदत सामुहिक रजा आंदोलनाच इशारा

 

जळगाव, प्रतिनिधी । अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना शासकीय सेवेत नियमित करा अन्यथा २९ एप्रिलपासून  बेमुदत सामुहिक रजा आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनतर्फे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद  यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

महाराष्ट्रातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभागीय निवड मंडळातर्फे नियुक्त सुमारे ४०० ते ५०० सहाय्यक प्राध्यापक कार्यरत आहेत. हे तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असणारे सहाय्यक प्राध्यापक मागील एक वर्षापासून जीवाची पर्वा न करता कोरोना  संकट काळात  फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन शासनाने त्यांचा  शासकीय सेवेत समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या कोरोना काळात १८० अस्थायी सहाय्यक प्राध्यापक कोरोना बाधित असून यामुळे त्यांच्या परिवारात देखील कोरोनाचा फैलाव झाला आहे. कायम सेवेत घेण्याच्या मागणीसाठी असोसिएशनतर्फे वेळोवेळी आंदोलने, संप पुकारण्यात आले आहेत. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने सर्व अस्थायी सहाय्यक प्राध्यापक गुरुवार २९ एप्रिल पासून बेमुदत सामुहिक रजा आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. इम्रान पठाण, डॉ. प्रसन्ना पाटील, डॉ. सिद्धार्थ चौधरी, डॉ. धनश्री पाटील, डॉ. चेतन भंगाळे, डॉ. आस्था गणेरीवाल, डॉ नेहा चौधरी, डॉ. अमित भंगाळे, डॉ. मनोज पाटील, डॉ. समीर चौधरी, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. उत्कर्ष पाटील,  डॉ. प्रदीप माले  आदींची स्वाक्षरी आहे. 

 

Protected Content