पारोळा राम मंदिर देवस्थानला महामार्गावरी भूसंपादनाचा वाढीव मोबदला सुपूर्द !


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा येथील राम मंदिर देवस्थानला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ (NH6) प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या बदल्यात वाढीव मोबदला म्हणून आज १४ कोटी १६ लाख इतकी प्रचंड रक्कम सुपूर्द करण्यात आली. ही रक्कम मंदिर विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

आज सकाळी अमळनेरचे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी स्वतः राम मंदिरात जाऊन ही रक्कम देवस्थानच्या विश्वस्त मंडळाकडे सुपूर्द केली. याप्रसंगी पारोळा येथील तहसीलदार श्री. उल्हास देवरे यांचीही विशेष उपस्थिती होती.

या वाढीव मोबदल्यामुळे राम मंदिर देवस्थानला भविष्यातील विकासकामे हाती घेण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे. ही रक्कम मंदिर विकासासाठी आणि धार्मिक ठिकाणांच्या सशक्तीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. या महत्त्वपूर्ण पावलामुळे परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.