कोरोनातून बरे होणार्‍या रूग्णांच्या संख्येत वाढ

 

नवी दिल्ली । देशभरात कोरोनातून बरे होणार्‍या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे आज आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतून अधोरेखीत झाले आहे.

देशात गेल्या दोन दिवसांपासूल सलग ८२ हजारांहून अधिक कोरोनामुक्त रुग्णांना विविध रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या ४८ तासांमध्ये तब्बल १ लाख ६५ हजार ६८० रुग्णांनी कोरोनावर मात मिळवल्याने दिलासा मिळाला आहे. कोरोनामुक्तांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.  बुधवारी ८२ हजार ७१९ सक्रिय रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.

आतापर्यंत एकूण ४० लाखांहून अधिक रूग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रूग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रूग्णांची संख्या ३० लाखांपेक्षा जास्त हे प्रमाण चार पटीने अधिक आहे. बरे झालेल्या रूग्णसंख्येतील वाढीमुळे गेल्या ३० दिवसांतील बरे झालेल्या रूग्णांच्या सरासरीत देखील १००% वाढ नोंदवण्यात आली आहे. बरे झालेल्या एकूण रूग्णांपैकी एक पंचमांश हून अधिक अर्थात १७,५५९ (२१.२२%) रूग्ण महाराष्ट्रातील असून त्याखालोखाल आंध्र प्रदेशमधले (१०,८४५), कर्नाटकमधील (६,५८०), उत्तर प्रदेशमधले (६,४७६) आणि तामिळनाडूमधले (५,७६८) असे ३५.८७% रूग्ण बरे झाले आहेत. या सर्व राज्यांमधील एकूण ५७.१% रूग्ण बरे झाले आहेत.

देशभरात गेल्या २४ तासात कोरोना संसर्गामुळे १,१३२ रुग्ण दगावले आहेत. यात महाराष्ट्रातील ४७४ जणांचा समावेश असून दगावलेल्या एकूण रूग्णांपैकी ४०% पेक्षा जास्त रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्या खालोखाल उत्तर प्रदेश (८६), पंजाब (७८), आंध्र प्रदेश (६४) आणि पश्‍चिम बंगाल (६१) अशा चार राज्यांमधील २५.५% रूग्ण गेल्या चोवीस तासांत दगावले आहेत.

Protected Content