Home धर्म-समाज राज्यातील शेती पिकांना अस्मानीचा धोका, पुढील काही दिवस पावसाची शक्यता

राज्यातील शेती पिकांना अस्मानीचा धोका, पुढील काही दिवस पावसाची शक्यता

0
45


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मुंबईच्या हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील शेती पिकांना अस्मानीचा धोका असून ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे.

मार्च म्हटला म्हणजे उन्हाच्या झळांना सुरुवात झाली आहे. बाहेर फिरतांना डोक्याला रुमाल, टोपी परिधान करण्याचे दिवस मात्र न्हाळ्याच्या चटक्यांना सुरुवात होत असतांनाच राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता मुंबईच्या हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यातील काही ठिकाणी हवामान ढगाळ राहणार असून पावसाच्या सरीही कोसळण्याची शक्यता आहे. दि. ७ ते ९ मार्च, दरम्यान महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका व काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे


Protected Content

Play sound