पारोळा अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयिताचा पोलीस कोठडी वाढ

पारोळा प्रतिनिधी । अपहरण व सामूहिक अत्याचार करून खून करणाऱ्या मुख्य संशयित आरोपी संशयित आरोपीच्या पोलीस कोठडी दोन दिवसाची वाढ ही न्यायालयाने केली आहे. तालुक्यातील टोळी येथील वीस वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक आत्याचार करून विष पाजण्यात आले होते. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीचा मामा यांनी दिलेल्या फिर्याद वरून टोळी येथील तीन जणांवर व एक अनोळखी महिला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मुख्य आरोपी शिवनंदन पवार याने स्वतः विषारी पदार्थ सेवन केल्याने त्याच्यावर धुळे येथे पोलीस बंदोबस्त मध्ये उपचार हे सुरू होते. त्याला दवाखान्यातून सुटी मिळताच पोलिसांनी त्यास 19 रोजी ताब्यात घेत अटक केली होती. दरम्यान त्यास त्यावेळी विशेष न्यायालया पुढे हजर करण्यात आले होते.

न्यायालयाने त्याला 23 नोहेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज ती कोठडी संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयाने 25 नोहेंबर पर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे. दरम्यान या मुख्य संशयितला दरम्यान फिर्यादी प्रमाणे घटनाक्रम आणी पोलीस तपासातील घटनाक्रम वस्तुस्थिती ही वेगळीच समोर येत आहे. अशी चर्चा आहे. त्यामुळे हे प्रकरण वेगळयाच मार्गाने मार्गक्रमण करणार अशी शक्यता वर्तवली जात असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Protected Content