पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कासोदा, आनंदनगर, तांडा येथील सरपंच भास्कर राठोड, उपसरपंच समाधान राठोड, नवल राठोड, प्रदिप राठोड, आकाश राठोड यांच्यासह कासोद्यातील ॲड. वसंत पाटील, ॲड.प्रतिभा पाटील, सागर शेलार, नयना मराठे व अन्य १५ कार्यकर्त्यांनी भाजपा एरंडोल-पारोळा विधानसभा निवडणूक प्रमुख करण पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नगरसेविका अंजली पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या वेळी भाजपा शैक्षणिक संस्था जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील, मोर्चा जिल्हा महिला आघाडी प्रमुख संगीताताई गवळी, जिल्हा चिटणीस सरलाताई पाटील, अनुसूचित जाती मोर्चा तालुकाप्रमुख मिलिंद मोरे, भाजप शहर उपाध्यक्ष अनिल शेलार, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस राहुल मराठे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष राहुल चौधरी, तालका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, युवा मोर्चा सोशल मीडिया तालूका प्रमुख गणेश मोरे ,शैलेश मंत्री, सागर शेलार, करण पाटील, भोला शेलार, रोहित शेलार, कृष्णा शेलार, मनोज मराठे, निखिल मराठे, गौरव मराठे, पवन शेलार, प्रथमेश वाणी, राज भाटिया, जय सुतार, शैलेश पांडे, दीपक पाटील, योगेश पाटील, नितीन पाटील यांच्यासह करण पाटील मित्र परिवाराचे सदस्य तथा भाजपा पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.