जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या 5 दिवसात डांभूर्णी, यावल या भागातून सर्पदंश झालेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या पैकी डांभूर्णी येथील शेतकऱ्याला कोब्रा तर यावल तालुक्यातील शेतकऱ्याला घोणस या विषारी सर्पाने दंश केल्याचे दिसून आले आहे , हे दोन्ही रुग्ण शेतात चारा कापत असताना दंश झाला आहे शेतात काम करत असताना योग्य काळजी घेतली तर हे जीवघेणे दंश टाळता येऊ शकतात या साठी काय काळजी घ्यावी या बाबत वन्यजीव संरक्षण संस्थे तर्फे आवाहन करण्यात आले आहे. शेतात चारा कापताना पायात बूट घालणे, सभोवताल काठीने गवताची हालचाल करा किंवा हातात माती घेऊन गवतात फेकून काही क्षण थांबून मग लक्ष ठेऊन चारा काढा . शक्य झाल्यास हातात मोठे जाड सेफ्टी हातमोजे घालून काम करा. साप भक्ष्याच्या शोधात शेतातील गोठ्यात किंवा घरा जवळील अडगळीत येत असतो, त्या मुळे विशेष काळजी घेतली पाहिजे.
काय घ्यावी काळजी
घरात जमिनीवर झोपू नये घरात किंवा बाहेर बीळ असल्यास ती बुजावी, दरवाजा ला फट असल्यास बंद करावी घराच्या दरवाज्याला उंबरठा असावा, रात्रीच्या वेळी शूज उंच जागी ठेवावे त्यात रात्री साप आसरा घेतात.
आय टी आय मुलांचे वसतिगृहात मध्यरात्री विद्यार्थ्यांना शूज मध्ये साप दिसल्याची घटना नुकतीच घडली होती त्या वेळी वन्यजीव संरक्षण संस्था सदस्य सर्पमित्र हेमराज सपकाळे यांनी मण्यार जातीचा साप रेस्कु केला होता . जिल्हाधिकारी निवासस्थानी मध्यरात्री आढळून आलेल्या सापास संस्थेचे सचिव योगेश गालफाडे, राजेश सोनवणे यांनी रिक्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडला होता पाळधी सावदा रोडवर संत बाळू मामा मंदिरासमोर खडी मशीन मध्ये गणेश सपकाळे यांनी अजगर रेक्यु केला होता. लोहारा येथे सर्पमित्र साई यांनी गुरांच्या पाणी पिण्याच्या हौदात 3 फुटाचा अजगर रेस्क्यू केला. राजेश सोनवणे यांनी पोलीस अधीक्षक यांचे बंगल्यात डुरक्या घोणस जातीचा साप रविंद्र भोई,जगदीश बैरागी यांनी सावखेडा शिवारातील शेतकऱ्यांच्या घरातून रात्री 5 फुटाचा कोब्रा रेस्कु केला.
धरणगाव येथे जिनिंग मध्ये आढळून आलेले नाग , घोणस , धामण व नागाचे पिलू भरत शिरसाठ व टीम ने रेस्कु करून निसर्गात सोडले आहेत संस्थेचे सर्पमित्र प्रदीप शेळके, सतीश कांबळे, निलेश ढाके, वासुदेव वाढे , ऋषी राजपूत, विनोद खोडपे, अरुण सपकाळे, दिनेश सपकाळे, विनोद सोनवणे , तुषार रंधे, रवींद्र भोई, अशोक खामकर, संतोष चौधरी, रितेश भोई, सुरेंद्र नारखेडे, राहुल सोनवणे या सर्पमित्रांनी विषारी, बिनविषारी , निम विषारी प्रजातींचे 200 पेक्षा जास्त सर्प रेस्क्यू करून निसर्गात मुक्त केले आहेत एकंदरीत शहरी भागात आणि ग्रामीण भागात सर्प आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध शाळा, ग्रामपंचायत, कंपनी मध्ये सर्प जनजागृती अभियान सुरू असून आपल्या गावात जनजागृती करायची असल्यास अध्यक्ष रविंद्र फालक ,सचिव योगेश गालफाडे संस्थापक बाळकृष्ण देवरे यांना कळवावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे