माऊली फाउंडेशनतर्फे स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका वर्गाचे उद्घाटन


bhadgaon

भडगाव (प्रतिनिधी)। गेल्या तीन वर्षापासून विविध सामाजिक विधायक उपक्रम राबवणाऱ्या माऊली फाउंडेशन भडगाव च्या वतीने नुकतेच भडगाव मधील पेठ या भागात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची पुस्तके देऊन अभ्यासिका वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलन व प्रतिमपूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रा.दीपक मराठे सर यांचा भौतिकशास्त्र या विषयात पी.एचडी. पदवी मिळाल्याबद्दल सपत्नीक शाल , श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.व्यासपीठावर उपस्थित असलेले विजय देशपांडे, प्रा.दिनेश तांदळे, प्रा.डॉ.अतुल देशमुख, दगडू मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
प्रा.डॉ.मराठे यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश शिंपी सरांनी तर आभार प्रदर्शन संजय सोनार यांनी केले. अभ्यासिकेसाठी प्रशांत पवार, महेश पाटील, रवींद्र कुळकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फौंडेशनचे आनंद चावरेकर, सुशिल महाजन, विशाल सोनवणे, प्रतिभा कुलकर्णी, मिताली चावरेकर, प्राजक्ता देशमुख, दीपमाला जगताप, पुनम अग्रवाल, मनीषा पाटील,शोभा महाजन
यांनी परिश्रम घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here