पाचोऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३१ व्या जयंती साजरी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संपूर्ण शहरात निळे झेंडे लावून शहर सुशोभित करण्यात आले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचे संकट असल्याने विविध सन व उत्सव साजरे करण्यात आले न्हवते या वर्षी कोरोनापासून काहिसा दिलासा मिळाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. सकाळी दहा वाजता नागसेन नगर भागातील प्रार्थना स्थळावर सार्वजनिक उत्सव समितीतर्फे आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, मुकुंद बिल्दिकर, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, आगार व्यवस्थापक निलिमा बागुल, समितीचे अध्यक्ष प्रविण ब्राम्हणे, उपाध्यक्ष अजय सावळे, सुभम खर्चाणे, सचिव मिलिंद तायडे, खजिनदार राजू सोनवणे, कार्याध्यक्ष भैय्या खेडकर, सहसचिव अमोल कदम, राहुल दामोदर, आकाश नन्नवरे यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सर्व समाजसेवकांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

यावेळी पाचोरा महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. वासुदेव वले, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, नगरसेवक अशोक मोरे, भुषण वाघ, वासुदेव महाजन, भालचंद्र ब्राम्हणे, ए. बी. अहिरे, अविनाश सावळे, खलील देशमुख उपस्थित होते. यावेळी ध्वजारोहण करुन प्रार्थना करण्यात आली. युवकांतर्फे संपूर्ण शहरातुन मोटारसायकल रॅली काढून उत्सव साजरा करण्यात येत आहे. पाचोरा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संपूर्ण शहरात निळे झेंडे लावून शहर सुशोभित करण्यात आले आहेत.

शहरातील विविध भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येत आहे. रेल्वे स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर (पाटील), पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, अॅड. अविनाश भालेराव, सत्यभामा अहिरे, गुणवंतराव पवार, उपमुख्याधिकारी प्रकाश भोसले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. पाचोरा येथील शेठ मुरलिधरजी मानसिंगका महाविद्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगरपरिषद, श्री. गो. से. हायस्कूल, निर्मल इंटरनॅशनल स्कूल,शिंदे इंटरनॅशनल स्कूल सह ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा व ग्रामपंचायतीमधे आंबेडकर जयंती साजरी करण्यात येत आहे.

Protected Content