जळगाव प्रतिनिधी । शहरातील महिलांचे आरोग्य, उद्योग व सुरक्षिततेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी, यासाठी शहरातील शाहू नगर येथे लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने ७ शाखांचे उद्घाटन करण्यात आले आहे. ह्या प्रत्येक शाखेत अध्यक्ष, सचिव, प्रसिध्द प्रमुख व १५ सदस्य अशी कार्यकारणी स्थापन करण्यात आली. ह्या वेळी शाहू नगर पासून भव्य अशी मिरवणूक काढत चौकात सभा ही घेण्यात आली.
लोकसंघर्ष मोर्चा हा जाती धर्म लिंग ह्या भेद भावाच्या पलीकडे लोकांच्या हितासाठी व शाश्वत विकासासाठी निर्माण चळवळ हे ब्रीद वाक्य घेवून काम करीत आहे आणि ते काम संविधानाच्या चौकटीत राहून गरज पडल्यास रचनात्मक संघर्ष सुध्दा उभा करत लोकांच्या न्यायासाठी काम केले जाईल व शाहूनगर मधील महिलांनी आपली स्वतःची स्वतंत्र शाखा उघडून महिलांच्या हक्कासाठी काम करण्याचा जो निर्धार केला आहे. त्याचे लोकसंघर्ष मोर्चाच्या संस्थापक अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी विशेष कौतुक केले आहे.
यावेळी विनोद देशमुख यांनी जळगाव शहरातील रस्ते, वीज, पाणी हे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक संघटित ताकद उभी करू, असे सर्वांना प्रतिपादन केले. लोकसंघर्ष मोर्चाच्या शाहू परिसरात सात शाखांचे उद्घाटन सायंकाळी चार ते सहा वाजेच्या दरम्यान करण्यात आले. लोकसंघर्ष मोर्चाने जळगाव शहरातील रेशन, रोजगार, रस्ते, पाणी व महिला शोषितान वर होणारे अत्याचार विरोधात एल्गार उभा करावा म्हणून शहराती युवकांनी एकत्र येत लोक संघर्ष मोर्चाच्या शाखांच्या फलक अनावरण केले.
ह्या अनावरण प्रसंगी लोक संघर्ष मोर्चाचे सचिन धांडे लोक संघर्ष मोर्चा मागील २० वर्षा पासुन शोषित वंचित, गरीब महिला यांच्या सोबत काम करीत असून जळगाव शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी ही सर्वांनी एकत्र येत काम करू यात शोषण व बेरोजगारी सारख्या प्रश्नांना आपण मिळून मार्ग काढू यात आपल्या सर्व संघर्षात लोक संघर्ष मोर्चा आपल्या सोबत असेल असे ही यावेळी ते म्हणाले.
याप्रसंगी मुकुंद सपकाळे, मिंलीद सोनवणे, विजय पाटील, राजेश पाटील हे उपस्थित होते. लोक संघर्ष मोर्चा शाखेचा अध्यक्षा भिस्ती मोहोल्ला, उपाध्यक्ष शरिफा अखतर भिस्ती, हिनाबी जुबेर खाटीक, नूरानी मस्जीत शाखेचे अध्यक्ष तनविर फारूक खाटीक, मटन मार्केट शाखेचे अध्यक्ष सादीक खाटीक, मोहम्मद अली चौक शाखेचे अध्यक्ष सै अमिर सै दगडू, फिरोज पान सेंटर शाखेचे अध्यक्ष फिरोज मोहम्मद पिंजारी, इंदिरा नगर शाखेचे अध्यक्ष वसिम खान अयुब खान, आदिवासी हाऊस शाखेचे अध्यक्ष आसिफ शेख अब्दुला यांची उपस्थिती होती