शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीची रक्कम अदा करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू – सुनील देवरे-पाटील

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवड ( शेवगा) कामाचे मस्टर्स पुन्हा सुरु करण्यात यावे  तसेच प्रशासकीय मान्यतेनुसार नुसार शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीची रक्कम अदा करण्यात यावी अन्यथा  तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुनील देवरे पाटील यांनी दिला. ते तहसील कार्यालयावरील शिंगाडा मोर्चा प्रसंगी दिला.

 

मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवड ( शेवगा) कामाचे मस्टर्स गटविकास अधिकारी विजय दत्तात्रय लोंढे यांनी चौकशीनिमित्ताने व त्यांना सलग्न असलेले इतर कर्मचारी व काही ठराविक ग्रामरोजगार सेवक यांच्यामुळे बंद असलेले मस्टर्स सुरु करण्यात यावे.  मागील अर्थिक वर्षात इस्टीमेट प्रमाणे लाभार्थी यांचे प्रलंबीत रक्कम मिळावी. त्यास जबाबदार असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी मनरेगा वृक्ष लागवड (शेवगा) लाभार्थी यांचे केलेल्या नुकसानीमुळे संबंधीतावर गुन्हे दाखल होणेबाबत पारोळा तहसील कार्यालयावर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारोळा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा शिंगाडा मोर्चा काढण्यात आला.  यावेळी श्री देवरे यांनी सांगितले की, प्रशासकीय मान्यतेनुसार शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यात यावी व शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक, पिळवणूक थांबवावी व शेतकऱ्यांची कामं करावीत अन्यथा महाराष्ट्र शेतकरी संघटना अति तीव्र आंदोलन करेल.

मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थावर माल्यार्पण दौलतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व पुढे राणी लक्ष्मीबाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करण्यात येऊन पुढे नायब तहसीलदार यांना तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले

या मोर्चा चे प्रमुख मार्गदर्शक उपस्थिती म्हणून शिवसेनेचे माजी तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील,जनसेवक पी.जी.पाटील,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सोनवणे, राहुल सरदार, राहुल पाटील, मनोहर पाटील,देवेंद्र पाटील, प्रविण बेलेकर हे होते तर सदर मोर्चा ला छावा संघटनेचे विजय पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रज्वल चव्हाण,वसंत पवार,छोटूभाऊ लोहार, हर्षल वाघ प्रहार अपंग क्रांती संस्था चे शकील शेख,राजमल वाघ,धर्मराज पाटील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे महेश पाटील, राहुल पाटील व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content