पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे माणुसकी ग्रुपच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
गावातील सुट्टीवर आलेले सैनिक जगदीश तेली, भिका जाधव, चंद्रकांत गीते, नितीन क्षीरसागर, प्रतीक पवार, शशिकांत गीते (पुणे पोलिस) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. लोहारा बस स्टँड परिसरात बाजारपेठेचे गाव असल्याने नेहमीच खेड्यातील नागरिकांची वर्दळ असते. माणुसकी समूह समाजासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. आता उन्हाळ्यात थंड पाणी मिळणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जयंती असल्याने खऱ्या अर्थाने जयंती या ठिकाणी पाणपोई चे उद्घाटन करून माणुसकी समूह साजरी करीत असल्याचं माणुसकी समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी प्रभाकर चौधरी, डॉ प्रमोद जैन, डॉ. केयुर चौधरी, शांताराम बेलदार, अमोल पाटील, शुभम धनगर, गोपाल पाटील, बापू पाटील, ज्ञानेश्वर भिवसने,अशोक चौधरी, फ्रेंड टेलर, समाधान ओतारी, विठ्ठल भडके, कडू चौधरी आदी माणुसकी समूहाचे सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते.