महिलेच्या पर्समधून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने लांबविले

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बस स्टॅण्ड ते महाराणा प्रताप चौका दरम्यान एका महिलेच्या पर्स मधुन अज्ञात चोरट्याने १ लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे लंपास केल्याची घटना गुरूवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:४५ ते १:२० वाजेच्या सुमारास घडली असुन घटनेप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनिषा प्रशांत पाटील (वय ३३) रा. दाबकी रोड, अकोला या भारतीय रेल्वेच्या अकोला येथे नोकरीस आहे. मनिषा पाटील यांचे माहेर वाडीशेवाळे ता. पाचोरा येथील असल्याने त्यांचे माहेरी येणे -जाणे सुरू असते. दरम्यान मनिषा पाटील यांच्या चुलत भावाचे लग्न असल्याने मनिषा पाटील ह्या पती प्रशांत पाटील व दोन मुलांसह गुरूवारी २३ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अकोला येथुन पाचोरा येथे रेल्वेने येण्यासाठी निघाल्या होत्या. दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वेस्थानकावरुन रिक्षाने त्यांनी बसस्थानक गाठले. पाचोरा बसस्थानक पाचोरा ते धुळे बसमध्ये मनिषा पाटील ह्या परिवारासह बसल्या. बस ही शहरातील भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात आल्यानंतर मनिषा पाटील यांनी त्यांच्या जवळ असलेली पर्स बघितली असता पर्सची चैन उघडी दिसल्यानंतर मनिषा पाटील पर्स चेक केली असता पर्स मधील ७० हजार रुपये किंमतीची साडेतीन तोळ्याची सोन्याची गळ्यातील माळ, ५० हजार रुपये किंमतीची अडीच तोळ्याची सोन्याची चैन व १० हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाचे कानातील कर्णफुले अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे मनिषा पाटील यांच्या लक्षात येताच सर्वत्र शोधाशोध केली असता दागिणे मिळाले नाही. त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद शिंदे हे करीत आहेत.

Protected Content