जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेद्वारे महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मशालीचे प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमात महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तळवेलकर, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जळगांव शहर महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, महापौर जयश्री महाजन, ए.टी.झांबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, जळगांव जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशनचे अध्यक्ष हर्षल चौधरी, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सहसचिव, व महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे सचिव दयानंद कुमार, प्रशासकिय अधिकारी शशिकांत वडोदकर, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे, जळगांव जिल्हा हॉशी स्क्वैश असोसिएशनचे सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदिप तळवेलकर, क.ब.चौ.उ.म. विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, आंतरराष्ट्रीय जिम्नेस्टिक्स प्रशिक्षक प्रा. निलेश जोशी, महाराष्ट्र राज्य फ्लोअरबॉल संघटना सचिव रविंद्र चोथवे, जळगांव जिल्हा हौशी स्क्वैश असोसिएशनचे सह-सचिव डॉ. रणजित पाटील, म.न.पा.च्या नगरसेविका उज्वला बेंडाळे, मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.सं.ना.भारंबे, अशोक राणे, संदीप जगताप आदी. उपस्थित होते.
दि. 8 मे ते 11 मे या कालावधीत एकलव्य क्रीडा संकुलचे स्क्वॅश कोर्ट, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर या ठिकाणी होणार आहेत. यात महाराष्ट्रातील 20 ते 25 जिल्ह्याचा सहभाग या स्पर्धेत असून प्रत्येक जिल्हा आणि वयोगटातून जास्तीत जास्त 20 ते 25 खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेकरिता एकूण 12 पंच अधिकारी व 4 ते 5 संघटना पदाधिकारी आहेत. सदर स्पर्धा या जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असून या स्पर्धेत महाराष्ट्रातून ५०० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत.
खान्देशातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनात गेल्या 05 वर्षात ऑलम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, 05 वूडन बेटमिटंन कोर्टस आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 10 मी. शूटिंग रेंजनंतर आता भव्य व अद्ययावत अशा 05 स्क्वॅश कोर्टसची उभारणी करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले तर अध्यक्षीय मनोगत केसीई सोसायटी कोषाध्यक्ष डी टी पाटील यांनी व्यक्त केले.आभार डॉ.रणजित पाटील व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाबराव पाटील यांनी केले.