मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगरात मोठ्या प्रमाणात खुलेआम सट्टा, मटका अवैध प्रकार सुरु असून कारवाई का कली जात नाही ? असा प्रश्न विचारत यामागे राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहेत.
शहरामध्ये परिवर्तन चौकालगतच असलेल्या ब्रहानपूर रस्त्यावर ज्या हात गाड्या लागलेल्या आहे त्यामध्ये हात गाड्यावर टपरी तयार करून मटकाचे दुकान थाटलेले आहे. नेमका मटका चालू होण्यामागचे कारण काय राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहेत
मुक्ताईनगर शहरामध्ये अवैध धंदे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. शहराच्या मधोमध खत्री गल्ली वसलेली आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का होत आहे मध्यंतरी भ्रमणध्वनीद्वारे व चोरीचोरी चुपकेचुपके असा प्रकार चालू होता परंतु आता खुलेआम सट्टा मटका घेतला जात आहे.
या प्रकरणाला नेमके आता कोणाचे अभय मिळत आहे? प्रशासन की राजकीय वर्तुळातून हातभर या प्रकाराला लागत आहे ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. असे जर नेहमी चालू असले तर लहान मुलाचे भविष्य धोक्यातच असून मुले चुकीच्या वळनाकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून मोठा गुन्हासारखा प्रकारदेखील घडू शकतो. डॉ.विवेक सोनवणे यांच्या दवाखान्याजवळ व समोरील भागात सट्टा व मटका याचे मोठ दुकान थाटून बसलेले असतात व आता ऍपे रिक्षामध्येसुद्धा सट्टा, मटका घेतला जात आहे. याकडे पोलीस प्रशासन लक्ष देतील का ? असा प्रश्न पालक वर्गामध्ये विचारला जात आहे.
एवढे जर खुलेआम सट्टा चालू असला तर स्थानिक पोलीस प्रशासन करतात तरी काय ? यात आर्थिक हित संबंध तर जोपासला जात नाही ना? असाही प्रश्न उपस्थित करून स्थानिक नागरिक चर्चा करत आहे. मागील काही महिन्यांमध्ये राजकीय वर्तुळातून अवैध धंद्याबाबत आरोप प्रत्यारोप होतांना दिसून आले तर स्थानिक व एलसीबी यांनी कारवाई केली परंतु नाशिक विभागीय आईजी यांच्या पथकानेसुद्धा पीडी चालक पालक यांच्यावर गुन्हे दाखल करून संपूर्ण सट्टा हा बंद स्वरूपात केला होता परंतु लागलीच सट्टा मटका चालू होण्याचे कारण देखील गुलदस्त्यातच बंद स्वरूपात आहे. आताही आई जी पथकामार्फत कारवाई होईल का ? की राजकीय वर्तुळातूनच आवाज उठवला गेल्यावर कारवाई होईल ? याकडे स्थानिक आमदार यांनी व राज्याचे गृहमंत्री यांनी लक्ष देण्याची गरज आहे असे मुक्ताईनगरवासीय बोलत आहे.
या मटका प्रेमी खेळत असल्या कारणाने कित्येक संसार उध्वस्त झालेले आहे. बहुतांश प्रमाणात मोलमजुरी करणारे व्यक्ती हा आशेने जमा झालेले पैसा हा मटका खेळण्यात लावत आहे व घरी जाताना खाली हात परतत आहे.