पाचोऱ्यात गरबा दांडियाचे जल्लोषात उद्घाटन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथे आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून व कल्पकतेतून संपन्न होत असलेल्या “जागर शक्तीचा- उत्सव भक्तीचा जल्लोष-२०२२, दांडीया स्पर्धेचे सोमवारी दि. २६ रोजी सायंकाळी ७ वाजता जल्लोषात उद्घाटन झाले. पहिली माळ असली तरी प्रेक्षकांनी अलोट गर्दी या कार्यक्रमात दिसुन आली. पैठणी सह बक्षीसांची लय लूट झाल्याने उपस्थितांचा चांगलाच प्रतिसाद लाभला.

पाचोरा शहरातील मानसिंगका ग्राऊंडवर दि. २६ सप्टेंबर ते दि. ४ ऑक्टोबर दरम्यान “जल्लोष – २०२२, जागर शक्तीचा- उत्सव भक्तीचा” या घोषवाक्या अंतर्गत गरबा दांडियारासचे ग्रीन अँपल इव्हेंट्सच्या माध्यमातुन आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन दि. २६ रोजी सोमवारी सायंकाळी आदिशक्ती देवीचा जागर व आरती करून करण्यात आले. याप्रसंगी आमदार किशोर पाटील, आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर, एम. एस. पी. बिल्डकॉनचे संचालक मनोज पाटील, जारगावचे सरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख सुनिल पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, बंडू चौधरी, स्पर्धेचे मुख्य आयोजक सुमित किशोर पाटील, अपूर्व थेपडे, आदित्य बिल्दीकर, पाचोरा पिपल्स बँकेच्या संचालिका मयुरी मुकुंद बिल्दीकर, ग्रीन ॲपल इव्हेंट्सचे संदीप महाजन, भूषण पेंढारकर, राहुल पाटील, जितेंद्र काळे, गुड्डू शेख, धनराज पाटील, आदि उपस्थित होते.

नाशिक येथील अमोल पालेकर आर्केस्ट्रा ग्रुपच्या गायक व वादकांनी सुर व संगीताची मैफिल उधळण करत धमाल केली. आमदार किशोर पाटील यांच्या विकास कामांवर आधारित प्रश्नांची उत्तरे व महिलांसाठी परफेक्ट मॅचिंग यासाठी पैठणीसह बक्षीसे देण्यात आली. यात आशा दांडगे, छाया खरे, संगीता येवले, वैशाली पाटील, रंजना जगताप, प्रीती सोनवणे या महिला पैठणी व बक्षीसांच्या मानकरी ठरल्या. आमदार किशोर पाटील, मुकुंद बिल्दीकर, मनोज पाटील, मयुरी मुकुंद बिल्दीकर, सुमित पाटील,आदित्य बिल्दीकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत स्पर्धकांनी नोंदणीसाठी गर्दी केली त्यामुळे प्रवेशासाठी दोन दिवस वाढवण्यात आले असून दि. २७ व २८ रोजी सायंकाळपर्यंत नोंदणी सुरू राहणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. भुसावळ येथील प्रकाश भैय्या यांनी अत्यंत ओघवत्या व कर्णमधुर शब्दात सूत्रसंचलन व धावते वर्णन केले. कार्यक्रमा दरम्यान स्पर्धकांना स्पर्धेसाठीची नियमावली सांगून सहकार्याचे आवाहन केले.

या स्पर्धेसाठी दोन एक्टिवा, फ्रिज, वॉशिंग मशीन, एल.ई.डी., सायकली अशा भव्य बक्षिसांची लयलूट करण्यात येत असून प्रत्येक सहभागी स्पर्धकालाही ११००/- रुपयांच्या वस्तुरूप बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. गरबा दांडिया रासच्या अंतिम दिवसापर्यंत दररोज आमदार किशोर पाटील यांच्या विकास कामांवर आधारित प्रश्नांची उत्तरे व महिलांसाठी नवरात्रीच्या नऊ रंगांवर आधारित परफेक्ट मॅचिंग यासंदर्भात पैठणी सह बक्षीसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी शितल महाजन, प्रीती बोथरा, उर्वशी मोर, दुष्यंत खंडेलवाल, मानविल सालोमन परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. दि. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे व गायिका वैशाली माडे यांच्या हस्ते “जल्लोष – २०२२” चे बक्षीस वितरण होणार असून यावेळी या अभिनेत्रींच्या अभिनय व गाण्यांची जुगलबंदी रंगणार आहे. या स्पर्धेचा आनंद लूटण्याचे आवाहन आमदार किशोर पाटील, सुमित पाटील, मुकुंद अण्णा बिल्दीकर, आदित्य बिल्दीकर व ग्रीन ॲपल इव्हेंट्सच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content