पाचोरा न्यायालयात वकील संघाच्या ई-फायलिंग केंद्राचे उद्घाटन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगावनंतर जिल्ह्यातील पहिल्या पाचोरा वकील संघाच्या ई फायलिंग केंद्राचे उद्घाटन २१ जुलै रोजी दुपारी २ वाजता जिल्हा व सत्र प्रमुख न्यायाधीश एम.क्यु. एस. एम. शेख यांच्याहस्ते करण्यात आले.

 

या कार्यक्रमाच्या याप्रसंगी पाचोरा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश मंगला जी. हिवराळे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य तथा गार्डीयन मेंबर अॅड. अमोल सावंत, जळगांव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. केतन ढाके, पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील, उपाध्यक्ष अॅड. मंगेश गायकवाड, सचिव अॅड. राजेंद्र पाटील व्यासपीठावर होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश एम. क्यु. एस. एम. शेख यांच्या हस्ते ई फायलिंग केंद्राचे फित कापुन उद्घाटन करण्यात आले. पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातुन उपस्थितांना ई फायलिंगचे महत्व पटवुन सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश एम. क्यु. एस. एम. शेख यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. अॅड. अमोल सावंत व अॅड. केतन ढाके यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लिपिक अनिल शिंदे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पाचोरा वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. प्रविण पाटील यांनी मानले.

Protected Content