यावलमध्ये सेनेतर्फे मुख्यमंत्र्याना पाठींबा आणि बंडखोरांचे निषेर्धात आंदोलन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथे शिवसेनेच्या वतीने पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठींबा देण्यासाठी व बंडखोरांचे निषेर्धात आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यात शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मागील अडीच वर्षात लक्ष वेधणारे चांगले कार्य करणाऱ्या शासनाला गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीत शिवसेनेचे बंडखोर आमदारांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्र राज्यातील शासन अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना व्यक्त करत बंडखोर आमदारांच्या विरोधात सेनेच्या कार्यकर्ते  आणि शिवसेनेच्या तालुक्यातील पदाधिकारी यांनी सेनाप्रमुखांना पाठींबा दर्शवत बंडखोर आमदाराच्या निषेर्धात आंदोलन केले.

यावल पंचायत समितीच्या आवारातून आज सायंकाळच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठींबा देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. शहरातील भुसावळ टी पाँईटवर आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्यात तर बंडखोरांचे जाहीर निषेध व सेना पक्ष प्रमुखांना पाठींबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

यात शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, जिल्हा उपसंघटक दिपक बेहडे, शिवसेना तालुका प्रमुख रविन्द्र सोनवणे, तालुका उपप्रमुख शरद कोळी, यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, तालुका संघटक गोपाळ चौधरी, आदीवासी सेनेचे तालुका प्रमुख हुसेन तडवी, माजी तालुका सेना प्रमुख कडु पाटील, यावल शहर उपप्रमुख संतोष धोबी, अल्पसंख्यांक तालुका संघटक अजहर खाटीक, तालुका उपसंघटक पप्पु जोशी, प्रसिद्धी प्रमुख संतोष धोबी, युवा सेनेचे सागर देवांग, पिटु कुंभार, शहर उपप्रमुख योगेश चौधरी, विजय पंडीत व आदी कार्यकर्ते व पदधिकारी यांनी सहभाग घेतला.

Protected Content