यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यात मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी उन्हाचा पारा अधिक जाणवत असुन,दुपारच्या वेळेत उन्हाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या घरात पोहचला असुन शहरात अघोषीत संचारबंदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
यावल शहर व तालुक्यात यंदा प्रथमच ४३ अंश सेल्सिअस गाठले आहे. सर्वत्र उष्णतेची लाट उसळी असुन उन्हाचा पारा अधिक चढला असल्याने नागरिक उकाड्यामुळे कमालीचे हैरान झाले आहे. आपली कामे नागरीक दुपारच्या बारा वाजेच्या आत आटोपुन घेतांना दिसत आहे. दरम्यान अति महत्वाच्या कामाशिवाय नागरिक बाहेर फिरताना दिसत नसल्याने रस्ते र्निमनुष्य झाले असल्याचे दिसुन येत आहे. वैद्यकीय सुत्रांनुसार मानवी शरीराचे तापमान साधारणपणे ९८.६ अंशाच्या जवळपास असते. शरीरातील सर्व गुंतागुंतीच्या प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी हेच तापमान ठेवणे आवश्यक असते. याकरीता वाढत्याअती उष्णतेत फिरतांना सर्व नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ञाकडून बोलले जात आहे.