यावल महाविद्यालयात बारावीच्या निकालात मुलींचीच आघाडी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सन २०२३-२४ या वर्षातील बारावी परिक्षेचा निकाल लागला असून यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा ९३.३८ % तर कला शाखेचा ७२ % तसेच किमान कौशल्य विभागाचा ८५ % निकाल लागलेला आहे.

यामध्ये विज्ञान शाखेची विद्यार्थिनी तडवी सानिया राजू हिने ७९.८३ % मिळून प्रथम क्रमांक तर चौधरी मनस्वी गणेश हिने ७९.३३% गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि जाधव यामिनी शिवाजी या विद्यार्थिनीने ७७.८३ % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. कला शाखेतून पंडीत श्रद्धा राजू या विद्यार्थिनीने ७०.५०% मिळून प्रथम क्रमांक तर जगताप सीमा अर्जुन हिने ६५.३३ % गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि पाटील माधुरी योगेश हिने ६३.८३ % मिळून तृतीय क्रमांक मिळवला. किमान कौशल्य विभागात बारी दिपीका विजय या विद्यार्थिनीने ७१.१७% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर पाटील रेणुका समाधान ६६.६७ % गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर पाटील वैशाली मंगलसिंग ६४.३३% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्था चालक, प्राचार्या संध्या सोनवणे यांच्यासह उपप्राचार्य संजय पाटील, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले त्यांच्या यशामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचे सुद्धा अभिनंदन केले.

Protected Content