Home Cities यावल यावल महाविद्यालयात बीएसएफ पो.नि. महेंद्र पाटलांचे मार्गदर्शन

यावल महाविद्यालयात बीएसएफ पो.नि. महेंद्र पाटलांचे मार्गदर्शन

0
29

यावल प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे सीमा सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षणासाठी प्रवृत्त करण्याबरोबरच भरतीपूर्व स्पर्धा परीक्षाची तयारी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया सभागृहात आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रम प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व कार्यक्रमाचे आयोजन उपप्राचार्य प्रा. संजय पाटील यांनी केले. प्रास्ताविक  उपप्राचार्य प्रा. एम डी खैरनार यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. डी. एन. मोरे, प्रा. सि. के. पाटील, प्रा. प्रवीण पाटील, प्रा. शेखर चव्हाण, प्रा. मनोज पाटील यांनी सहकार्य केले यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 


Protected Content

Play sound