पाचोरा – जामनेर रेल्वे तातडीने सुरु करावी – शेंदुर्णी नगरपंचायतीची मागणी

शेंदुर्णी प्रतिनिधी | पाचोरा – जामनेर नॅरो गेज रेल्वे तातडीने सुरु करण्याबाबत शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने विभागीय मध्य रेल्वे कार्यालय भुसावळचे व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात, “पाचोरा जामनेर ही नॅरो गेज रेल्वे सुमारे शंभर वर्षापासून सुरू होती. मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे सर्वत्र रेल्वे बंद होत्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सदर होऊन सर्व रेल्वे हळूहळू सुरू झाल्या आहेत. मात्र दुर्दैवानं पाचोरा जामनेर रेल्वे अजून पर्यंत बंद आहे. ही रेल्वे ग्रामीण भागातील अनेक व्यक्तीच्या जीवनाशी निगडित असून बंद असल्यामुळे सुमारे ग्रामीण भागातील २०० गावांचा संपर्क तुटला आहे .

ही रेल्वे बंद असल्यामुळे शिकण्यासाठी जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून त्यामुळे त्यांचं कधीही न भरून येणारं शैक्षणिक नुकसान होत आहे. या मार्गाचं विस्तारीकरण होऊन ब्रोक्रेज लाईन टाकून रेल्वे बोदवडपर्यंत येणार असल्याचे बोलले जात आहे. हे काम चांगलं असून तातडीने झालं पाहिजे याबाबत कोणतेही दुमत नाही. मात्र तोपर्यंत नॅरो गेजवरील पाचोरा जामनेर रेल्वे बंद करणे उचित नाही.

त्यामुळे जनतेची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने पाचोरा जामनेर येथे सुरू करावी. जनतेच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वी युद्धपातळीवर काम सुरू करावे अन्यथा पाचोरा ते जामनेर भागातील नागरिक त्रस्त होऊन मोठ्या प्रमाणात विरोध करतील. याची रेल्वे प्रशासनाने नोंद घ्यावी.” अशा आशयाचे निवेदन जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी विभागीय व्यवस्थापक मध्य रेल्वे कार्यालय भुसावळ यांना दिलं आहे.

Protected Content