राष्ट्रवादीच्या मिरवणुकीत…’एकच वादा साहेबरावदादा’ ! : अमळनेरात चर्चेला उधाण (व्हीडीओ)

162798c7 31b1 4bfd 99ed 37b67c56849c

अमळनेर प्रतिनिधी | आज राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी काढण्यात आलेली मिरवणूक माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या दारात पोहोचताच …एकच वादा साहेबरावदादा ही घोषणा सुरु झाली. विशेष म्हणजे सध्या भाजपात असूनही साहेबराव पाटील यांनी मिरवणुकीत शिरत कार्यकर्त्यांचे हस्ताआंदोलन स्वीकारले. ही घटना बघून अनेकांच्या भूवया उंचावल्या तर यामुळे मात्र, अमळनेरात चर्चेला मोठे उधाण आले आहे.

या संदर्भात अधिक असे की, येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांची उमेदवारी अर्ज भरण्याची मिरवणूक माजी आमदार व सध्याचे भाजपाचे नेते साहेबराव पाटील यांच्या घराजवळून आज दुपारच्या सुमारास जात होती. यावेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी एकच वादा साहेबरावदादा…व एकच वादा…अजितदादा अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. साहेबराव पाटील यांनी आपल्या घरासमोर रेंगाळलेली गर्दी बघत बाहेर येवून कार्यकर्त्यांची भेट घेतली. एवढेच नव्हे तर खेळाडूवृत्ती दाखवत अनिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, विधानसभा लढवणार की, नाही? हे अद्याप साहेबराव पाटील यांनी जाहीर केलेले नाही. त्यामुळे आजच्या या घटनेचे अनेक अर्थ काढले जात आहेत. साहेबराव पाटील हे निवडणूक लढले किंवा नाही लढले तरी विरोधी पक्षाच्या नेत्याची मिरवणूक जात असताना बाहेर येवून त्यांना शुभेच्छा देणे, यानिमित्ताने त्यांनी एक सकारात्मक संदेश दिला आहे. परंतू आजच्या घडीला याचा राजकीयदृष्ट्या मात्र वेगवेगळा अर्थ काढला जाऊ जातोय, हे देखील तेवढेच खरे आहे.  साहेबराव पाटील निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेतात. यावर अमळनेर विधानसभा मतदार संघाचा निकाल ठरणार आहे. त्यामुळे श्री.पाटील यांची भूमिका नेमकी अनिल पाटील यांच्या फायद्याची असेल की, शिरीष चौधरी यांच्या पारड्यात वजन टाकणारी, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.

 

Protected Content