चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवा, सुप्रीम कोर्टाकडे मागणी

chidambaram

 

नवी दिल्ली (प्रतिनिधी) माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआय कोठडी देऊ नका. त्यांना न्यायालयीन कोठडी देऊन तिहार तुरुंगात पाठवा, अशी मागणी सीबीआयने आज सर्वोच्च न्यायालयात केली. सुप्रीम कोर्टाने मात्र ५ सप्टेंबरपर्यंत पी. चिदंबरम यांची सीबीआय कोठडी कायम ठेवली आहे.

 

सोमवारी झालेल्या घडामोडींमध्ये पी. चिदंबरम यांना अंशतः दिलासा मिळाला. कारण सुप्रीम कोर्टाने तिहार तुरुंगात चिदंबरम यांची रवानगी करु नये असे म्हटले. तुरुंगात पाठवण्याऐवजी नजरकैदेत ठेवा असा प्रस्ताव चिदंबरम यांनी कोर्टाला दिला होता. त्यानंतर आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी पी.चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवले जाऊ नये असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. आता याच संदर्भात सीबीआयने पुन्हा एकदा पी. चिदंबरम यांची रवानगी तिहार तुरुंगात करावी असे म्हटले आहे. सीबीआयचा हा युक्तिवाद तात्काळ ऐकण्यास कोर्टाने नकार देत चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली. मात्र त्यानंतर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. सीबीआयबरोबरच ईडी देखील या प्रकरणाची चौकशी करीत आहे.

Protected Content