खळ्यातील झोपडीत तरूणाने घेतला टोकाचा निर्णय

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल तालुक्यातील तालुक्यातील डांभुर्णी गावातील खळ्यातील झोपडीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. याप्रकरणी पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मुकेश नरसिंग बारेला (वय १७, रा. डांभूर्णी ता.यावल) असे मृत तरूणाचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश नरसिंग बारेला हा गावातील खळ्यात आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना घडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेवून मृतदेह खाली उतरवला. यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. अत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत मयत अल्पवयीन मुलीचे वडील नरसिंग सुमाऱ्या बारेला यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नरेन्द्र बागुले व पोलीस करीत आहे.

Protected Content