यावल, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हरभऱ्याच्या शेतात बकऱ्या चारण्याच्या कारणावरून शेतकऱ्याला सहा जणांनी बेदम मारहाण केली तर एकाने विळ्याने वार करून जखमी केल्याची घटना यावल तालुक्यातील अट्रावल जवळील शेतात घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, “किशोर देवराम राणे (वय-४६) रा. यावल हे आई-वडील, पत्नी व मुलांसह वास्तव्याला आहे. त्यांनी तालुक्यातील अट्रावल शिवारात निम्मे हिस्स्याने शेत केलेले आहे. शेतात त्यांनी हरभराचे पीक पेरले होते. १२ मार्च रोज सकाळी ७ वाजता किशोर राणे यांची आई सिंधुबाई या मजुरांसह शेतात गेले असता. त्यांच्या हरभऱ्याच्या शेतामध्ये काहीजण बकऱ्या चारत होत. ही माहिती सिंधूबाई यांनी मुलगा किशोर राणे यांना दिली.
त्यानुसार किशोर राणे हे शेतात आले व बकऱ्या चारणाऱ्यांना हटकले. याचा राग आल्याने राजेंद्र काशिनाथ जाधव, विनोद गोविंदा खैरे, अनिल धनगर, भुरा छगन धनगर, एकनाथ भिल आणि बबलू धनगर सर्व रा. यावल यांनी किशोर राणे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली व यातील संशयित आरोपी राजेंद्र जाधव यांनी हातातील विळ्याने किशोर राणे यांच्यावर वार करून जखमी केले. या संदर्भात किशोर राणे यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुनिता कोळपकर करीत आहे.