Home क्राईम विश्रामजिंन्सी येथे अस्वलाच्या हल्लात पारडी जागीच ठार

विश्रामजिंन्सी येथे अस्वलाच्या हल्लात पारडी जागीच ठार

0
46


रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील विश्रामजिंन्सी येथे घराच्या बाजूला बांधलेल्या पारडीवर अस्वलाने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भिती निर्माण झाली आहे.

याबाबत सुत्रांकडून मिळेलेल्या माहितीनुसार, विश्रामजिंन्सी येथे राजेंद्र पद्मसिंग पवार यांच्या घराच्या बाजुला बांधलेल्या पारडी बांधली होती.आज सकाळी पहाटच्या सुमारास अस्वलाने हल्ला पारडीवर हल्ला करून जागीच ठार मारल्याची घटना आज घडली आहे. याची माहिती वन विभागाला मिळताच वनपाल अतुल तायडे घटनास्थळी जाऊन पगमार्ग बघितले असता हल्ला करणारा प्राणी अस्वल असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर के. डी. बाविस्कर,  पोलिस पाटील गोकुळ पवार यांच्या सक्षम पंचनामा करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound