यावल महाविद्यालयातर्फे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबीर उत्साहात

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे विशेष श्रमसंस्कार शिबीर ११ ते १७ मार्च या कालावधीत बोरावल खुर्द येथे पार पडले.

सात दिवसीय शिबिरात ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले. यात पाण्याची टाकी, जिल्हा परिषद शाळा, स्मशानभूमी व विठ्ठल मंदिर परिसरात  स्वयंसेवकांनी  स्वच्छता मोहीम राबवली.तसेच व्यसन मुक्ती , सेंद्रिय शेती- विषमुक्त शेती, प्लास्टिक मुक्त गाव, स्वच्छतेचे महत्व या विषयावर रॅली काढून व पथनाट्य सादर करून स्वयंसेवकांनी ग्रामस्थांचे प्रबोधन केले. कौटुंबिक सर्वे व कोरोना जागृतीसाठी सर्वे करण्यात आला.

दुपारच्या बौद्धिक सत्रात विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यात   डॉ.एन. डी. महाले (ग्रामविकासात तरुणाची भूमिका),प्रा. एम.खैरनार डी (राष्ट्रीय सेवा योजनेतून समाज प्रबोधन ),डॉ. एस. पी. कापडे (व्यक्तिमत्व विकास ),प्रा. एस. आर. गायकवाड (स्पर्धा परीक्षेचे महत्त्व) ,प्रा.ए .पी पाटील (कोरोना नंतरची भारतीय अर्थव्यवस्था), कृषी अधिकारी दिनेश कोते (सेंद्रिय शेती काळाची गरज ) शैलेश पाटील (स्पर्धा परीक्षा :अभ्यासाचे तंत्र),  वीरेंद्र पाटील (छत्रपती शिवबा :अष्टपैलू व्यक्तिमत्व), प्रा. एम.पी. मोरे (स्त्री पुरुष समानता ), प्रा. मनोज पाटील( सोशल मीडियाचा वापर), डाॅ. ए. आर. वर्डीकर ( रा. से.यो.शिबिराची उपयोजिता), प्रा. सुभाष कामडी (ग्रामस्वच्छता अभियानात युवकांची भूमिका) व प्रा .नरेंद्र पाटील( पर्यावरण जागृती )यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्वयंसेवकांमध्ये चिंतन, मनन व विचार विकसित करण्यासाठी कोरोनाचा दुष्परिणाम, वाचनाचे फायदे, सेंद्रिय शेती शाप की वरदान व ऑनलाइन शिक्षणाचे फायदे तोटे या विषयावर गटचर्चा घेण्यात आली. १७ मार्च रोजी शिबिराचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सचिन नांद्रे (संचालक, राष्ट्रीय सेवा योजना,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), सुनील भोईटे संस्था संचालक व बापूसाहेब भोसले सदस्य विद्यार्थी विकास समिती उपस्थित होते तर अध्यक्ष स्थान प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषविले.

याप्रसंगी सुचित्रा बडगुजर व धीरज बारसे यांनी मनोगत व्यक्त केले. उस्फुर्त वकृत्व स्पर्धेत प्रथम आलेली पूजा पाटील ,उत्कृष्ट स्वयंसेवक सुचिता बडगुजर व हेमंत भालेराव यांचा पाहुण्यांच्या हस्ते पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. बापू भोसले यांनी शिबिरातून मिळालेली संस्काराची शिदोरी घेऊन आयुष्यात यशस्वी होण्याचे आवाहन केले. डॉ. सचिन नांद्रे यांनी मार्गदर्शन केले की युवा हा वायू सारखा असावा. व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी अधिकाधिक वाचन करून शब्दसंग्रह वाढवणे गरजेचे असते. शिबिरातून पैलू पाडले जातात याचा समाजासाठी उपयोग करा. अध्यक्षीय भाषणात डॉ. संध्या सोनवणे यांनी सांगितले की स्वयंसेवकात सेवाभाव, त्याग, संवेदना, तत्परता व श्रम प्रवृत्ती आवश्यक असते.

शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.आर डी पवार ,महिला कार्यक्रम  अधिकारी डॉ.सुधा खराटे व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ .हेंमत भंगाळे यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ  सुनील पाटील, सचिन मोरे ,समाधान पाटील, प्रमोद जोहरे , अनिल पाटील, मिलिंद बोरघडे, राजीक शहा, शाहरूख तडवी नवमेश तायडे, सचिन बारी यांनी सहकार्य केले.

 

Protected Content