जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । युवासेना जळगाव तर्फे मंगळवार १ ऑक्टोबर रोजी सलग 4थ्या वर्षी कुमार गट जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन जी. एच. रायासोनी महाविद्यालय, जळगाव येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत 8 मुलांच्या तर 4 मुलींच्या असे एकुण 12 संघांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेला मुख्य अतिथी म्हणून शिवसेना उपनेत्या तथा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य सौ. शितल देवरूखकर-शेठ, शिवसेना जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, युवासेना कार्यकारिणी सदस्य जय सरपोतदार, कार्यकारिणी सदस्या धनश्री विचारे, युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, रावेर लोकसभेचे शिवसेना जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, वैषाली सुर्यवंशी, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडी महानगरप्रमुख गायत्री सोनवणे, शिवसेना जिल्हा संघटक गजानन मालपुरे, युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, जळगाव लोकसभा युवासेना कॉलेजकक्ष युवाधिकारी प्रितम शिंदे, युवासेना विस्तारक भुषणजी मुळाणे, प्रविणजी चव्हाण, जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव जितेंद्र शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
मुलांच्या संघात प्रथम स्थान पाचोरा बास्केटबॉल गृप, द्वितीय स्थान शिव छात्रपती क्रिडा मंडळ एरंडोल, तृतीय स्थान सेंट जोसेफ बास्केटबॉल अकॅडमी, जळगाव तर मुलींमध्ये प्रथम स्थान सेंट जोसेफ बास्केटबॉल अकॅडमी, जळगाव, द्वितीय स्थान पाचोरा बास्केटबॉल गृप, तृतीय स्थान जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन, जळगाव यांनी पटकावले. उत्कृष्ठ खेळाडू म्हणून मुलांमध्ये एरंडोल येथील पवन बेलदार तर मुलींमध्ये जळगावच्या निवेदिता ढेकळे यांना पारितोषीक देण्यात आले. विजेत्या संघांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले.