शेंदुर्णीत पत्रकार दिन उत्साहात

शेंदुर्णी प्रतिनिधी । येथील आचार्य गजाननराव गरूड पतसंस्थेतर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. 

तसेच यावेळी सत्कार कार्यक्रमात युवानेता स्नेहदीप गरूड, पतसंस्था व्यवस्थापक विनोद चौधरी, रोखपाल मोहन बारी, निलेश महाले, अलीम तडवी यांच्याहस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला असून यावेळी सर्व पत्रकार उपस्थित होते. दुपारी धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी ता. जामनेर द्वारा संचालित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी याठिकाणी  पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ,आचार्य गजाननराव गरूड,आण्णासाहेब गरूड यांच्या प्रतिमाचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी.उदार यांनी कार्यक्रम आयोजना मागचा हेतू स्पष्ट करतांना समाजात पत्रकारांची भूमिका व महत्व स्पष्ट केले. यावेळी कार्यक्रमात उपस्थित पत्रकार अतुल जहागीरदार, विलास अहिरे, डॉ. नीलम अग्रवाल, डॉ दीपक जाधव, योगेश सोनार, दिग्विजय सूर्यवंशी, हमीद शेख या सर्व यांचा सत्कार करण्यात आला. 

शिक्षण संस्थेचे सचिव सतीशजी काशीद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संस्थेचे चेअरमन व कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय गरुड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकार समाजात व लोकशाहीत किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक पी.जी. पाटील यांनी केले तर आभार विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस सी चौधरी यांनी मानले.

 

Protected Content