Home क्राईम प्रेम नगरात बंद घर फोडून मुद्देमाल लांबविला

प्रेम नगरात बंद घर फोडून मुद्देमाल लांबविला

0
111


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील कपाटातून  कपाटात ठेवलेले सोनेचांदीचे दागिणे असा एकून ५८ हजाराचा मुद्देमाल घेत चोरटे पसार झाले. शहरातील प्रेमनगरातील ही चोरी शुक्रवार २८ रोजी उघडकीस आली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतिभा सुभाष बडगुजर (५८) या गृहिणी प्लॉट नं.३१ प्रेमनगर याठिकाणी वास्तव्यास आहेत. गुरूवार २७ रोजी घराच्या दरवाजाला कुलूप लावून ते कामानिमित्त घराबाहेर पडल्या. कुलूपबंद घरावर चोरट्यांची नजर पडताच त्यांनी दरवाजाचे कुलूप तोडले. आतमध्ये किंमती वस्तूंचा शोध घेताना त्यांनी सामान अस्तव्यस्त केला. चोरट्यांनी चांदीचा फुलपात्र, साडेपाच ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चिप, चार ग्रॅम वजनाची अंगठी, चांदीचा आकडा, पायातील जोडवे, चांदीचे क्वाईन असा एकुण ५८ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सफौ गुलाबराव सैंदाणे हे करीत आहेत.


Protected Content

Play sound