जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रासाठी अमूल्य योगदान राष्ट्रमाता अहिल्यादेवींचे आहे. समाजाचा इतिहास जागर झाला पाहिजे. समाजबांधवांची प्रगती होण्यासाठी त्यांना घरातूनही प्रोत्साहन मिळाले पाहिजे. आपले कर्म चांगले असेल तर आपली प्रगती वेगात होते. प्रगती होण्यासाठी संघर्षाची देखील तेवढीच तयारी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी केले.
जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटना व सांस्कृतिक महासंघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व शाखीय धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व समाजातील यशस्वी व्यक्तींचा सन्मान रविवार दि. १ सप्टेंबर रोजी दुपारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
विचारमंचावर शहराचे आ. राजूमामा भोळे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी राहुल इधे, जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, माजी सभापती सुरेश धनके, पहुरचे मा सरपंच रामेश्वर पाटील,नाना बोरसे, गोपाल धनगर,मल्हार सेनेचे सुभाष सोनवणे, रेखा न्हाळदे, मंजुषा सूर्यवंशी,प्रभाकर न्हाळदे,वसंत भालेराव,रमेश सुलताने,जयेश कुयटे,प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे , दिलीप धनगर, गणेश बागुल,अहिल्या महिला संघ अध्यक्ष प्रमिला कंखरे, डॉ. गोपाल घोलप, डॉ. सिद्धांत घोलप, आदी उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पूजन करीत माल्यार्पण केले. यानंतर प्रस्तावनेमधून धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश स्पष्ट करून समाजातील गुणवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम घेतल्याची माहिती दिली. यानंतर विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. विजय शिरसाठ लिखित “दिव्याखालचा दिवा” या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार आत्मसात करीत युवकांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे. त्यानंतर सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची कास धरली पाहिजे, असे आ. भोळे म्हणाले.
कार्यक्रमांमध्ये इयत्ता १० वी व १२ वी मधील १२५ गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण, पीएचडी प्राप्त, विविध विषयांवर निवड होऊन पदोन्नती झालेले, वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण अशा समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला. यावेळी धनगर बोर्डिंगचे अध्यक्ष प्रभाकर न्हाळदे, मल्हार सेनेचे सरचिटणीस संदीप तेले, रमेश सुलताने, दिलीप धनगर, प्रमिला कंखरे, हिलाल सोनवणे उपस्थित होते.
सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे आणि गणेश बागुल यांनी केले. तर आभार निळकंठ पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामचंद्र चऱ्हटे, अरुण ठाकरे,विजय पवार, अनंता सैंदाणे,महेंद्र सोनवणे,सुनील खोमणे,निलेश न्हाळदे,डिगंबर सोनवणे,बापू पवार, प्रवीण पवार, किशोर कंखरे, मयूर ठाकरे आदींनी परिश्रम घेतले.