गिरीश महाजनांना महिला रणचण्डिकेचे अवतार दाखवतील ; रुपाली चाकणकर (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 10 01 at 7.17.08 PM

चोपडा, प्रतिनिधी | संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने सत्ताधाऱ्यांची पाया खालची वाळू सरकली आहे. महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. ही लाट अकार्यक्षम सरकार असल्याने निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीत जे निवडून येत नाही ते मंत्री होतात यापेक्षा दुर्दैव काय पाहिजे ? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकारशी संवाद साधतांंना उपस्थित केला.

 

चोपडा येथील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार जगदीशचंद्र वळवी यांच्या आज दि १ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्यासाठी त्या उपस्थित होत्या. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, नगरपालिकेचे नगराध्यक्षा मनीषा चौधरी, गटनेते जीवन चौधरी, पिपल्स बँकचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, आदी हजर होते. रुपाली चाकणकर ह्या पुढे म्हणाल्या की, दारूच्या बाटल्यावर महिलांचे नाव देण्याचं सांगणाऱ्याना आगामी निवडणुकीत महिला घरचा रस्ता दाखवतील. नवरात्रीचे दिवस आहेत महिलांचा रण चण्डिकेचा अवतार काय असतो ते दाखविल्या शिवाय राहणार नाही असा इशारा चाकणकर यांनी यावेळी दिला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या कार्यवर प्रश्न उपस्थित केलेत. जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्न, शेतकऱ्याचा प्रश्न, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळाले का ? आणि पालकमंत्री जिल्ह्यात कितीवेळा आणि कुठे फिरलात ? जिल्ह्याचे समस्यांकडे दुर्लक्ष करायचे आणि भफकेगिरी करायची याला राजकारण म्हणतात का ? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केलेत. ईडीच्या नोटीसावरून विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, ईडीची नोटीस म्हणजे सूडबुद्धीचे राजकारण होय. निवडणूक आली की शरद पवार यांच्यावर असे खोटेनाट्या कारवाया सुरू होतातच. शरद पवार जर दोषी होते तर पाच वर्ष ईडी का झोपले होते का ? शरद पवार यांचा निवडणूकीचा दौरा सुरू होता. त्यात त्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने त्याचमुळे ईडीच्या नोटिसाचे नाटक केले. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असा प्रकार झाला आहे. या निवडणुकीत गिरीश महाजनना महिलाच घरचा रास्ता दाखवतील असेही त्यांनी बोलतांना सांगितले.

Protected Content