नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नागपूर शहरातील राजनगर परिसरात एकाची बंदूकीच्या गोळया घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर घटना राजनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विनय पूनेकर असे मृतकाचे नाव आहे.
ते जुने प्रेस फोटोग्राफर आहे. घटना घडली तेव्हा विनय पूनेकर हे घरी एकटे असताना एक व्यक्ती आला आणि त्याने सायलेन्सर असलेल्या पिस्टलने पूनेकरांवर गोळी झाडून पळून गेला. संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. त्याने घरात घुसून पुनेकरांची हत्या केली. आरोपीने हे कृत्य का केले असावे याबाबत माहिती अदयाप मिळालेली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिक करत आहे. मृत विनय पूनेकर यांनी अनेक वर्षांपूर्वी प्रेस फोटोग्राफर म्हणून काम सोडले होते. ही घटना भर दुपारी दीड वाजता घडली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जातो आहे.