मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत’ लाभार्थी महिलांना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भांड्यांचा संच वाटप करण्यात आला. या योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाकडून बांधकाम कामगार महिला यांना मोफत उपयोगी साहित्य संच (भांडे) वाटप करण्यात येते. या सर्व योजनेमध्ये शिवसेना शहर संघटक वसंत भलभले यांचे सर्व लाभार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटूभाऊ भोई, शिवसेना तालुकाप्रमुख नवनीत पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, शिवसेना उपजिल्हा संघटक पंकज कोळी, शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, सुभाष दैवे, राजेंद्र तळेले, सुनील गवते, नरेंद्र सापधरे, सुरेश बोरे, ललित काठोके, मधुकर निळे, प्रल्हाद माळी, शंकर पाटील, अरूण काळे, प्रकाश कपले, रमेश मंडवाले, संतोष शेवाळे, किशोर भोई, विशाल सापधरे, गोपाळ काठोके, मंगलदास पवार, निलेश घटे, गणेश भोजणे, चेतन पाटील, गजानन काटे आणि शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.